Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

झोपडपट्टी धारकांच्या आरोग्य ‍ तपासणी शिबीरात महिला, मुले व इतर नागरिकांची रक्त तपासणीआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पुणे - झोपडपट्टी धारकांसाठी आरोग्य ‍ तपासणी शिबीर आयोजित केले होते. या शिबीरात 175 पेक्षा जास्त महिला, मुले व इतर नागरिक यांची रक्त तपासणी झो.पु.प्रा., पुणे यांनी नीलसॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सहकार्याने करण्यात आली.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे शहरातील झोपडपट्टी पुनर्वसनाचे व झोपडपट्टीधारकांना त्यांचे हक्काचे घर मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटत आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण फक्त झोपडपट्टीधारकांना घरच उपलब्ध करून देत नाही तर त्यांच्या राहणीमानाचा स्तर उंचावणे, दैनंदिन कचऱ्याची योग्यरितीने विल्हेवाट लावणे व आरोग्य विषयक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत असते. त्याच अंतर्गत झो.पु.प्रा., पुणे यांनी नीलसॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सहकार्याने मंगळवार (दि.१८) झो.पु.प्रा., पुणेच्या अखत्यारितील स.नं. 787+786 मंजुळाबाई चाळ, भवानी पेठ, पुणे येथील झोपडपट्टी धारकांसाठी आरोग्य ‍ तपासणी शिबीर आयोजित केले होते. या शिबीरात 175 पेक्षा जास्त महिला, मुले व इतर नागरिक यांची रक्त तपासणी करण्यात आली. तसेच या निवासी संकुलात वास्तव्य करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी डस्टबीनचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रम झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, नीलसॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या डायरेक्टर दक्षा बक्शी, तहसिलदार विकास भालेराव, श्रीमती सुदक्षिणा बॅनर्जी, श्रीमती मिथीला तुपेकर, शाखा अभियंता आर.डी.कांबळे यांचे उपस्थितीत पार पडला. उपरोक्त कार्यक्रमासाठी सर्व्हेक्षक आशुतोष शिंदे, सचिन भालेराव, गुजर, अमरदिप व स्वच्छ संस्थेचे कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य मिळाले.

Post a Comment

0 Comments