Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मानेवाडी, विठ्ठलनगर परिसरात बिबट्याचे दर्शन ; वनविभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

शेतकरी वर्ग भयभीत 
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी - तालुक्यातील डोंगर पट्ट्यातील चिंचपूर पांगुळ येथील मानेवाडी व विठ्ठलनगर परिसरात मंगळवारी रात्री बिबट्याचे पुन्हा दर्शन झाल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पंचक्रोशीतून केली आहे.

समजलेली माहिती अशी की, मंगळवारी (दि.२५) रात्री १०-११ वाजण्याच्या सुमारास लाईट आली. यानिमित्ताने अशोक कुटे हे शेतकरी आपल्या शेतात पिकास पाणी देण्यासाठी गेले होते. या दरम्यान, बिबट्या, एक पिल्लू पाहण्यास मिळाले आहे. यामुळे परिसरात बिबट्या आल्याची अफवा नसून घटना वास्तव आहे. यापूर्वी परिसरातील कुत्र्याचे बळी गेल्या च्या घटना घडल्या होत्या, ही घटना तरसमुळे घडली असा, संशय व्यक्त केला जात होता. पण मंगळवारी रात्री प्रत्यक्षात शेतकरी कुटे यांना बिबट्या पाहण्यास मिळाला, तसेच छायाचित्र उपलब्ध झाले आहे. शेतकऱ्यांकडे छायाचित्रे उपलब्ध असल्याने या वास्तव परिस्थितीमुळे वनविभागाने तातडीने उपयोजन करुन परिसरातील बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी परिसरातील सामाजिक संघटनेचे
कार्यकर्ते, शेतकऱ्यांनी केली आहे.

वाघीण वाघ एक पिल्लू एका शेतकऱ्याने पाहिले. शेतात गेल्या वरती
पाहिले लाईट आल्या व पाणी देण्या साठी गेलते रानात माहिती देतो अक्षय बारगजे
आशोक कुटे यांनी पाहिले

Post a Comment

0 Comments