Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

स्टेट बँकेत कर्मचारी तुटवडा ; नागरिक त्रस्त


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - स्टेट बँक मुख्य शाखेपासून नगर शहरातील सर्वच शाखांमध्ये कर्मचारी वर्ग अपुरा आहे. यामुळे बँकेतील कोणतीच कामे वेळेवर होत नसल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्टेट बँक प्रशासनाने तातडीने कारभार न सुधारल्यास बँकेविरोधात मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे.
स्टेट बँक चौकातील मुख्य बँक कार्यालयात अपुरा कर्मचारी वर्ग आहे. या परिस्थितीमध्ये शनिवारी (१५) ५ ते ७ कर्मचारी रजेवर आहेत. नवीन खाते उघडूने, दुसऱ्या शाखेत खात वर्ग करणे, खाते लिंक यासह विविध बँकेची महत्त्वपूर्ण कामे अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. नागरिकांना एका कामासाठी ५ ते ६ फेऱ्या माराव्या लागत आहे. यात ज्येष्ठ नागरिकांची मोठी हाल होते आहेत. बँकेत दोन ते तीन दिवस होऊन कामे मार्गी लागत नाहीत. याबाबत बँक वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क साधला, त्यांनीही अपुरे कर्मचारी असल्याचे कारण पुढे केले आहेत. तर वेळ नसल्यास दुसऱ्या बँकेत जा, असे बँकेचे अधिकारी सांगत आहे. नागरिकांना एका कामासाठी ४ ते ५ तास बँकेत ताटकळत बसून राहावे लागत आहे.
या सर्व स्टेट बँकेच्या परिस्थितीला नागरिक त्रस्त झाले आहेत. स्टेट बँकेने तातडीने सर्व बँक शाखेमध्ये कर्मचारी वाढवून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments