Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सय्यद बुडनशहावली यांचा संदल उत्साहात साजरा


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - जाती पातीच्या भिंती तोडून मानवता धर्माची शिकवण देणारे अवलिया संत म्हणजे सय्यद बुडनशहावली होय. मु.पो.पिंपरखंड ता.जामखेड येथे सय्यद बुडनशाहवली यांचा संदल नुकताच पार पडला. माद्य पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून या संदलला सुरुवात होते. सर्वजाती धर्माचे लोक या ठिकाणी फुलांच्या चादरी, मलिदा वगैरे घेऊन येतात व मनोभावे पूजा अर्चा करतात अशी माहिती नंदकुमार गायकवाड यांनी दिली. 
सय्यद बुडनशहावली यांचा इतिहास आजही पुर्णपणे जनतेसमोर आलेला नाही. सुमारे 100 वर्षापासून या कार्यक्रमाची परंपरा असल्याचे श्री. गायकवाड यांनी सांगितले. तसेच या ठिकाणचा जिर्णोध्दार व्हावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 
गायकवाड परिवाराकडून या उत्सवाच्यावेळी मागील 5 वर्षापासून दोन दिवस सकाळी सरबत व रात्री चहाचे वाटप केले जाते. येणाऱ्या प्रत्येक भाविक त्याचा मनोभावे प्रसाद म्हणून स्विकार करतात. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नंदकुमार गायकवाड, इसाक शेख, संभाजी तुपेरे, नाना काळे, अविनाश गायकवाड, सोमा गायकवाड आदिंनी प्रयत्न केले . 

Post a Comment

0 Comments