Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर शहरात चाकूचा धाक दाखवून लुटणारी टोळी जेरबंद ; कोतवाली पोलिसांची कारवाई

आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर - शहरात प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या चौघांना कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले. कय्युम काझी कुरेशी (वय २३, रा बाबा बंगाली, कलेक्टर कचेरीजवळ), सद्दाम मोहम्मद अली (वय २३, झेंडीगेट,नालसाब चौक), मोईन बादशाह शेख (वय २०, बुरुडगावरोड काळेगल्ली, भोसले आखाडा) व मुसेफ नासीर शेख (वय २०,मुकुंदनगर, जिशान काँलनी, भिंगार सर्व रा.अहमदनगर) अशी पकडण्यात आली असून, या आरोपीकडून इंडिका व्हिस्टा, कार, चाकू, ६ मोबाइल असा माल हस्तगत केला आहे. 
प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पो.नि.विकास वाघ, पो.उ.नि.सतीश शिरसाठ यांच्या सूचनेनुसार पोना शहीद शेख, गणेश धोत्रे, नितीन शिंदे, भारत इंगळे, पोकाँ सुजय हिवाळे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments