Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

स्वच्छ प्रेरणा अभियानाचा आण्णा हजारे, पोपटराव पवार, डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते शुभारंभ


आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर - निरोगी, सुंदर आणि समृद्ध शहराकडे यशस्वी वाटचालीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या संकल्पनेतून 'स्वच्छ प्रेरणा अभियान' या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ पद्मश्री पोपटराव पवार, पद्मविभूषण अण्णा हजारे, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते झाला. 

सहकार सभागृहात प्रेरणा प्रतिष्ठानच्यावतीने
पद्मश्री पोपटराव पवार, पद्मविभूषण अण्णा हजारे, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचा आयोजित नागरी सत्काराप्रसंगी 'स्वच्छ प्रेरणा अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.
पद्मश्री पोपटराव पवार यांचा अहमदनगर शहरवासीयांच्या वतीने व आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला. 
यावेळी आ. संग्राम म्हणाले,
नगर शहरात दैनंदिन कचरा संकलन केले जात असून महानगरपालिका प्रशासन व सर्व नागरिकांच्या सक्रिय सहभागातून नगर शहर ८०% कचरामुक्त व कचरापेटीमुक्त करण्यात आपल्याला यश आले आहे. परंतु एवढ्यावरच थांबून आपल्याला चालणार नाही तर निरोगी, सुंदर आणि समृद्ध शहराकडे यशस्वी वाटचाल करण्यासाठी सुरू केलेल्या 'स्वच्छ प्रेरणा अभियान' या अभिनव उपक्रमातून नगर शहराला आपल्याला देशात नावलौकिक असलेले नंबर एकचे स्वच्छ शहर बनवायचे आहे. या कामात पद्मश्री पोपटराव पवार यांचे आपल्याला मार्गदर्शन लाभणार असून लवकरच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नगरसेवक व विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांच्या सहभागातून या कामाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. या उपक्रमात नगर शहरवासीयांचा सक्रिय सहभाग आवश्यक असून आपण सर्वांनी मिळून नगर शहराला कचरा व कचराकुंडीमुक्त शहर करायचे आहे.
पद्मश्री पोपटराव पवार यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा नगर जिल्ह्याचा गौरव आहे. सामाजिक कामात सातत्य ठेवल्यामुळे पवार हे तीस वर्षांपासून सरपंच आहेत. या नागरी सत्कार सोहळ्याच्या प्रसंगी आमदार अरुण जगताप, डॉ. शरद कोलते, उद्योजक प्रदीप गांधी, महापौर बाबासाहेब वाकळे आदीसह नगरसेवक व मान्यवर व नगर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments