Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्ह्यासह नगर शहरात शिवजयंती उत्साहात साजरी


आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर - जिल्ह्यात ठिकाठिकाणी शिवाजी महाराजांच्या जय घोषात शिवजयंती मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडल्या. नगर येथील माळीवाडा बसस्थानक जवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आमदार संग्राम जगताप, माजी आमदार अनिल राठोड, महापौर बाबासाहेब वाकळे आदिंसह मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शिवपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलिस अधिक्षक पाटील साहेब, आमदार संग्राम जगताप, जिल्हा मराठा प्रसारक समाजचे अध्यक्ष नंदकुमार झावरे साहेब, म.बा.स. सभापती लताताई शेळके, शिवप्रहारचे अध्यक्ष संजीव भोर, ॲड. शिवाजीराव कराळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. नगर शहरातील केडगाव, भिंगार, सावेडी, माळीवाडा येथील विविध चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विविध संघटना, मित्र मंडळाच्या कार्यकर्यांनी पूजन केले.
अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली.


Post a Comment

0 Comments