Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर उपविभागातील दहावी व बारावीच्‍या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्‍मक आदेश(संग्रहीत छायाचित्र)
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - जिल्‍हयात उच्‍च  माध्‍यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ12 वी)  दि. 18 फेब्रुवारी, 2020 ते दि. 18 मार्च 2020 या कालावधीत व  माध्‍यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ.10 वी) दिनांक 3 ते 23 मार्च,2020  या कालावधीत परीक्षा होणार आहेत. या परीक्षेसाठी  नगर उपविभागातील नगर, नेवासा तालुक्‍यांमध्‍ये इयत्‍ता 12 वी चे  23 केंद्र व इयत्‍ता 10 वी चे 43  केंद्रावर परीक्षा घेण्‍यात येणार आहे. परीक्षा उपकेंद्राच्‍या 100 मिटर परिसरात कोणालाही बेकायदेशीररित्‍या प्रवेश करता येऊ नये व परीक्षेच्‍या संबंधाने असलेले परीक्षार्थी अधिकारी व कर्मचारी  यांच्‍या व्‍यतिरिक्‍त कोणत्‍याही व्‍यक्‍तीस प्रतिबंध होण्‍यासाठी दिनांक 18 फेब्रुवारी 2020 ते 23 मार्च 2020 या कालावधीत परीक्षा केद्राच्‍या चोहोबाजूस 100 मिटर परीसरात सी.आर.पी.सी. 1973 चे कलम 144 (3) अन्‍वये आदेश जारी केला आहे.   सदरच्‍या आदेशानुसार परीक्षा उपकेंद्राच्‍या  100 मीटर परीघामध्‍ये असलेले सार्वजनिक  टेलिफोन एसटीडी/आयएसडी/ फॅक्‍स केंद्र, ध्‍वनीक्षेपक, झेरॉक्‍स मशिन, स्‍कॅनिग मशीन, मोबाईल फोन व इतर इलेक्‍ट्रॉनिक माध्‍यमे, वस्‍तू  कार्यान्वित ठेवता येणार नाहीत.  त्‍याचप्रमाणे परिघामध्‍ये उचितरितीने परीक्षार्थी म्‍हणून घोषित केलेले उमेदवार व परीक्षा पार पाडण्‍यासाठी सक्षम अधिका-यांनी प्राधिकृत केलेल्‍या व्‍यक्‍तीशिवाय  इतर व्‍यक्‍तीना, वाहनांना, पायी अथवा इतर रितीने फिरण्‍यास,उभे राहण्‍यास प्रतिबंध करण्‍यात येत आहे. असे उपविभागीय दंडाधिकारी, (नगर भाग)  उज्‍वला गाडेकर  यांनी सांगितले.                              

Post a Comment

0 Comments