Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दरोड्यांच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद ; एलसीबीची कारवाई
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - दरोड्यांच्या तयारीत असलेली कर्नाटक गुलबर्गा येथील चौघांना मोठ्या शिताफीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. 
 देवराज कष्णप्पा खंडमची (वय ४५, रा.आलमचेक पोस्ट, झोपडपट्टी, गुलबर्गा, कर्नाटक), मारुती शिवकुमार खंडमचा (वय १९, रा.रेल्वे स्टेशन जवळ, गुलबर्गा, कर्नाटक), रवि आनंद खंडमचा (वय ३५, रा.आलमचेक पोस्ट, झोपडपट्टी, गुलबर्गा, कर्नाटक), नागराज देवराज खंडमचा (वय १९, रा.रा.आलमचेक पोस्ट, झोपडपट्टी, गुलबर्गा, कर्नाटक) असे पकडण्यात आलेल्याची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार नेवासा फाटामार्गे नेवासा-शेवगाव रोडवर नागापूर गावाच्या शिवारात वनीकरणाजवळ असणाऱ्या कमानीजवळ एलसीबी पोलिसांनी सापळा लावून चौघांना शनिवारी (दि.१५) रात्री पकडले असून एक फरार झाला. पकडण्यात आलेल्यांची अंगझडती घेतली असता, टिव्ही स्टार दुचाकी, सत्तूर, सुरा, लाकडी दांडके, वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल असा २२ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. अधिक चौकशी केली असता, नेवासा पोलीस ठाणे हद्दीत ४ लाख रुपये रक्कमेची चोरी केल्याची कबुली दिली. 
प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे- कांबळे, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि शिशिरकुमार देशमुख, सफौ सोन्याबापू नानेकर, पोहेकाँ बाळासाहेब मुळीक, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोना रविंद्र कर्डीले, विशाल दळवी, रवि सोनटक्के, आण्णा पवार, पोकाँ संदिप चव्हाण, राहुल सोळंके, शिवाजी ढाकणे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.


Post a Comment

0 Comments