Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आदर्श पत्रकार पुरस्कार अरुण वाघमोडे, आदिनाथ शिंदे यांना जाहीर


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर : महाराष्ट्र राज्य वक्तृत्व परिषदेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या गुणगौरव पुरस्कारांपैकी आदर्श पत्रकार पुरस्कार दै. लोकमतचे उपसंपादक अरुण वाघमोडे आणि दै.नगर स्वतंत्रचे उपसंपादक आदिनाथ शिंदे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचा वितरण सोहळा शेतकरी निवास सभागृहात मार्केटयार्ड, अहमदनगर या ठिकाणी दि.१६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वा. मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
महाराष्ट्र वक्तृत्व परिषदेने महाराष्ट्राचा महावक्ता राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजिय केली आहे. या निमित्ताने संयोजक समितीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची पुरस्कारासाठी निवड केली आहे. पत्रकारिता क्षेत्रात लोकमतचे उपसंपादक अरुण वाघमोडे आणि नगर स्वतंत्रचे उपसंपादक आदिनाथ शिंदे यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
वक्तृत्व प्रती आपली असणारी तळमळ, राज्यात युवा वक्ते घडविण्यात आपले असणारे योगदान आणि आपल्या पत्रकारितेने समाजात केलेली जनजागृती याचा विचार करता हा पत्रकारिता पुरस्कार समितीने लोकमतचे वाघमोडे आणि नगर स्वतंत्रचे आदिनाथ शिंदे यांना जाहीर केला आहे.अशी माहिती वक्तृत्व परिषदेच्या समितीने दिली आहे

Post a Comment

0 Comments