Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रामोशी समाजाच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध - ना.धनंजय मुंडेमुंबई मंत्रालयात प्रथमच क्रांतिवीर उमाजी नाईक यांची 188 वी पुण्यतिथी साजरी

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / राजेंद्र गडकरी 
मुंबई - आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची 188 वी पुण्यतिथी पहिल्यांदाच मंत्रालयात साजरी करण्यात येत असून आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांचे कार्य मोठेआहे, अशा आद्यक्रांतिकारक उमाजी नाईकांचा क्रांतिकारी रामोशी समाज आजही उपेक्षित जीवन जगत आहे.भटक्या जमातीत असलेला हा समाज विकसित प्रगतीशील होण्यासाठी हे शासन पूर्णतः प्रयत्न करेल, मी एक भटक्या समाजातीलच असून मला ही या समाजाची पूर्ण जाण आहे ,समाजाच्या मागणीप्रमाणे नरवीर उमाजी नाईक समाजसुधारक मंडळाचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण साहेब यांना विधान परिषदेवर किंवा वसंतराव नाईक महामंडळावर अध्यक्ष म्हणून घेण्यासाठी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करू असे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी या पुण्यतिथीनिमित्त मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंत्रालयात नामदार जयंत पाटील यांच्या कक्षात आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला नामदार मुंडे व आमदार जयंत पाटील यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.

त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री नामदार जयंत पाटील यांनीही आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या कार्याचा यावेळी गौरव केला. समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू असे आश्वासन दिले. सुरुवातीला समाजाचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी समाज व संघटनेची माहिती दिली. राज्य सरचिटणीस राजेंद्र गडकरी यांनी प्रास्ताविक केले. आभार बाळासाहेब नाईक यांनी मांडले. या कार्यक्रमाला आमदार मानसिंग नाईक तसेच मंत्रालयातील विविध अधिकारी व नरवीर उमाजी नाईक समाजसुधारक मंडळाचे राज्यातील पदाधिकारी व ऊमाजी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments