Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भगवान गडावरील शस्त्र चोरीचा पोलिसांनी तपास लावून आरोपीस जेरबंद करा ; अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
परळी वैजनाथ :- राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे वास्तव्य असलेल्या भगवान गडावरील ऐतिहासीक रायफल आणि तलवार चोरीस गेल्या घटनेचा पोलिसांनी तात्काळ छडा लावून आरोपीस अटक करावे अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लोकसेवा चे रामराव गिते यांनी एका निवेनाव्दारे शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत कदम व संभाजीनगरचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्फत गृहमंत्री यांच्याकडे दिला आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्यांतील सीमेवर असलेल्या, पाथर्डी तालुक्यातील खरवंडी गावाच्या बाजूला डोंगरावर वसलेल्या भगवानगडावर असलेल्या, भगवान बाबांच्या वापरातील वस्तूंच्या संग्रहातील 2 बोअरची रायफल सापडत नसल्याचे (ता.27) सकाळी उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक राठोड हे भगवान गडावर गेले आहेत. गडावरील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केल्यानंतर काही माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. त्यानुसार, मध्यरात्रीच्या सुमारास एका दुचाकीवर आलेल्या तिघांनी रायफल घेऊन गेल्याचे दिसत आहे. त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत.या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख आणि जागृत तीर्थक्षेत्र म्हणून श्रीक्षेत्र भगवानगड हे ओळखले जाते.भगवानबाबांनी उपयोगात आणलेल्या वस्तूंचे हे भव्य संग्रहालय आहे. दरम्यान या प्रकरणातील बहुजन समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या संत भगवान बाबांचे ऐतिहासिक साहित्य चोरीला जाणे ही गंभीर घटना असल्याचे रामराव गित्ते यांनी सांगितले आहे. राज्याचे गृहमंत्री मा.ना.अनिल देशमुख साहेब व मा.पोलिस अधीक्षक साहेब बीड व अहमदनगर यांनी विशेष लक्ष देऊन आरोपीस तात्काळ अटक करावी अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे. आरोपीस तात्काळ अटक करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामराव गित्ते यांच्यासह किशोर गिते, नरसिंग शिरसाट, शाम गिते यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments