Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गांजाची वाहतूक करणारे पकडले ; कोतवाली पोलिसांची कारवाई

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - केडगाव येथे पोलिसांनी सापळा लावून गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडण्यात आले. पंचासमक्ष दोघांची झडती घेतली असता, ७५ हजार ६९० रुपयांचा गांजासह मुद्देमाल जप्त करण्यात आला. मझर रहिम खान (वय ३३, पठाण काँम्प्लेक्सच्यामागे, बाजीबाजार घोडनदी, शिरूर, पुणे), सागर रामचंद्र धनापुरे (वय १९, एसटी काँलनी सुर्यानगर, तपोवन रोड, सावेडी, अहमदनगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. शहर पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार प्रशिक्षणार्थी अर्चीत चांडक, कोतवालीचे पो.नि. विकास वाघ, वैद्यमापन निरीक्षक आदिंसह पोलीस कर्मचारी पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments