Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दरोडा टाकून ट्रक चालकांची हत्या करणारी दरोडेखोरांची टोळी जेरबंदस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; पथकास १० हजाराचे एसपीकडून बक्षिस
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - निबंळक बायपास येथे दरोडा टाकून ट्रक चालकाची हत्या करून ट्रक व त्यामधील दूध पावडर नेणारी दरोडेखोरांची टोळी सोलापूर, पुणे व मुंबई या ठिकाणीहून जेरबंद केली. त्याच्या कडून ७३ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली. दिलीप अशोक मुंढे (रा.सोनहिवरा, ता.परळी, जि.बीड ह.रा.इंद्रायणीनगर, सेक्टर नं.३, बिल्डिंग नं.५३, भोसरी, ता.हवेली, जि.पुणे), रोहित उर्फ दाद्या शहाजी बनसोडे ( रा.शिरसागरनगर, ढवळस, ता.माढा, जि.सोलापूर,), महेश मोहन शिंदे (रा.जगदाळे नगर, कुर्डुवाडी, ता.माढा, जि.सोलापूर), ज्ञानेश्वर उर्फ सोनू विष्णू राऊत (सूतार आळी, ढवळस, ता.माढा, जि.सोलापूर), शिवाजी धनाजी पाटील (रा.पाटील वस्ती, उजनी, सोलापूर), शाहीद इस्माईल शेख (रा.वडजी, ता.वाशी जि.उस्मानाबाद, ह.रा.गंधर्वनगर, मोशी, ता.हावेली जि.पुणे) अशी पकडण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहेत. या आरोपींना दि.१८ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे.
 प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि संदीप पाटील, पोहेकाँ मनोहर गोसावी, दत्ता गव्हाणे, सुनील चव्हाण, दत्ता हिंगडे, सफौ.सोन्याबापू नानेकर, पोना. रवींद्र कर्डीले, आण्णा पवार, भागीनाथ पंचमुख, रवि सोनटक्के, संतोष लोढे, सचिन आडबल, योगेश सातपुते, रणजित जाधव, विजय ठोंबरे, दीपक शिंदे, मेघराज कोल्हे, सुरज वाबळे, बाळासाहेब भोपळे, सचिन कोळेकर, भरत बुधवंत आदिंच्या पथकाने उत्कृष्ट तपास करून आरोपींना पकडण्यात यश मिळविले. या पथकास उत्कृष्ट तपासाबद्दल प्रभारी पोलिस अधीक्षक सागर पाटील १० रुपये बक्षिस देण्यात आले.

Post a Comment

0 Comments