Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कँबिनेटमंत्री धनंजय मुंडे गुरुवारी भगवानगडावर ; गहिनीनाथगड व नारायणगड येथेही दर्शनाला जाणार
आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर -  राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री पदाचा पदभार स्वीकारताचा ना. धनंजय मुंडे हे दि. ९ रोजी अहमदनगर व बीड जिल्हा दौऱ्यावर येत आहे. ना.मुंडे शक्तीपीठ समजल्या जाणाऱ्या भगवानगडावर संत भगवानबाबा यांच्या समाधी दर्शन घेण्यासाठी येत आहेत. भगवानगडासह गहिनीनाथ गड व नारायणगड येथे जाऊन ते दर्शन घेणार आहेत. 

संत भगवानबाबा, संत वामनभाऊ, संत नारायण महाराज यांच्याप्रती ना. मुंडे यांची श्रद्धा आहे. २०१४ मध्ये भगवानगड येथे झालेल्या राजकीय घडामोडीनंतर ना. मुंडे यांना गडावर येण्यास मज्जाव करण्यात आला होता, मात्र काही दिवसांपूर्वी गडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांनी मुंबई येथे धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन 'मंत्री झाल्यावर भगवानगडावर दर्शनासाठी या' असे म्हणत ना. मुंडे यांना निमंत्रित केले होते. बाबांच्या प्रति असलेली श्रद्धा व महंत नामदेव शास्त्री यांच्या आदेशाप्रमाणे ना. मुंडे हे मंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच गडावर दर्शनासाठी येत आहेत. 
दि. ९ रोजी ना. मुंडे हे सकाळी १०.३० वा भगवानगड येथे येऊन दर्शन घेतील, त्यानंतर गहिनीनाथ गड व दुपारी नारायणगड येथे दर्शन घेण्यासाठी जाणार असल्याचे मुंडे यांच्या कार्यालयातून कळवण्यात आले आहे. यावेळी त्यांच्या समवेत माजलगाव चे आमदार प्रकाश दादा सोळंके, आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार अमरसिंह पंडित , जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

*बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक*

दरम्यान मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच जिल्हा दौऱ्यावर येत असलेले ना. मुंडे हे गुरुवारी (दि. ०९) दुपारी ४.०० वा जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसामावेत आढावा बैठक घेणार आहेत. जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजाची व सुरू असलेल्या विकासकामांचीही माहिती ना. मुंडे या बैठकीदरम्यान घेणार असल्याचे समजते. 

Post a Comment

0 Comments