Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रोहयोत अपहर केल्याप्रकरणी ग्रामसेवक काळे याला पोलिस कोठडी


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी या ठिकाणी रोजगार हमी योजनेच्या कामामध्ये ६१ लाख ६५ हजार रुपये अपहरण केल्याप्रकरणी गुन्ह्यातील अटक असलेला ग्रामसेवक सचिन बाळकष्ण काळे याला ६ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश पाथर्डी न्यायालयाने दिले आहेत. 

२०१२ ते १३ या दरम्यान पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी या गावामध्ये अंध, अपंग आणि प्रतिष्ठित लोकांचा रोहयो कामात मजूर यादीत बनावट नावे पोस्ट विभागात खाते उघडून त्यांच्या नावे बनावट आधारकार्ड तयार करण्यात आली, या आधारे खात्यातील पैसे परस्पर काढून घेतले. अभिलेख गहाळ केल्याप्रकरणी बाबा सानप यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी तत्कालीन देविदास खेडकर व ग्रामसेवक सचिन काळे या दोघाविरुध्द ६१ लाख ६५ हजार रुपयांचा अपहर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी ग्रामसेवक सचिन काळे याला शेवगाव पोलिसांनी अटक केली. आर्थिक गुन्हे शाखेचे पो.नि.भोये यांनी आरोपी काळे याला न्यायालयासमोर हजर केले असता, आरोपी काळे याला दि.१३ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. सरकार तर्फे अँड राहुल कोळेकर यांनी बाजू मांडली.

Post a Comment

0 Comments