Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त जिल्हा पोलीस दलामार्फत मोटारसायकल रँली


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - अहमदनगर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने महाराष्ट्र पोलिस स्थापन दिनानिमित्त मंगळवार (दि.७) नगर शहरातील धार्मिक ठिकाणींना मोटारसायकल राँलीच्या माध्यमातून भेटी देऊन प्रबोधन केले. यावेळी प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून मोटारसायकल रँलीस जिल्हा पोलीस कार्यालयातून प्रारंभ झाला. यावेळी
नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, परिवक्षिण पोलीस अधीक्षक अरचित चांडक, जिल्हा न्यायधीश सुनिलजित पाटील, अहमदनगर शहर प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष मन्सूर शेख, कोतवालीचे पो.नि.विकास वाघ, तोफखानाचे पो.नि. मुलाणी, भिंगार कँम्पचे पो.नि. प्रविण पाटील, वकील संघटनेचे सदस्य, पत्रकार आणि शांतता कमिटीचे सदस्य आदिसह पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments