Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर पत्रकार समन्वय समितीतर्फे पत्रकार दिन उत्साहात

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - नगर समन्वय समितीच्या वतीने सोमवार दि.६ जानेवारी रोजी सांयकाळी ७ वा. पत्रकार दिन उत्साहात पार पडला.
प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमहापौर मालनताई ढोणे या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष गुंदेचा, मिनाताई मुनोत हे होते.

यावेळी पुरस्कार मिळालेल्या पत्रकारांचा, ज्येष्ठ पत्रकारांचा आणि उपस्थित असणाऱ्या सर्वच पत्रकार, प्रेस फोटोग्राफारांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातपुते, दिलीप वाघमारे, अशोक सोनवणे, प्रकाश भंडारी, मिलिंद बेंडाळे, विजयसिंह होलम आदिसह दैनिक, साप्ताहिक, न्यूज पोर्टल व इलेक्ट्रॉनिक मिडियाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुधीर मेहता व शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन सय्यद वहाब यांनी केले, तर समितीचे बाबा जाधव यांनी प्रास्ताविक केले. आभार मन्सूरभाई शेख यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी समितीचे बाबा जाधव, मन्सूरभाई शेख, सुभाष चिंधे, बाबा ढाकणे, दीपक मेढे, रोहित वाकळे, प्रकाश साळवे, सिद्धेश्वर मेटे, विठ्ठल शिंदे आदिंसह सदस्यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments