Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे निमित्त नगर तालुका पोलीस ठाण्यात दातांचे शिबिर


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - पोलीस म्हटले की १२-१२ तास ड्युटी आली…त्यासोबतच आरोग्याकडे दुर्लक्षही आलंच, आणि त्यातचं महिला पोलीस म्हटल्या की त्यांना अधिकच आरोग्याची काळजी घ्यावी लागते. महिला पोलिसांनी देखील त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि नियमितपणे सर्व तपासण्या कराव्यात, दातांचे आरोग्य टिकवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन स्नेहबंध फौंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी केले.
महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे निमित्त स्नेहबंध सोशल फौंडेशन व गोरे डेंटल यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर तालुका पोलीस ठाण्यात दातांचे शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पोलीस उपनिरीक्षक धनराज जारवाल, डॉ.गोरे डेंटल हॉस्पिटलचे डॉ.सुदर्शन गोरे, पो. ना. अशोक मरकड,बापूसाहेब थोलाने, विनोद पवार, आकाश निऱ्हाळी,गौरव खोजे, म.पो.ना.कविता हरिश्चंद्रे, राजश्री चोपडे व सर्व पोलीस बांधव उपस्थित होते.
पोलीस उपनिरीक्षक जारवाल म्हणाले, आमचे कर्मचारी अहोरात्र काम करत असतात. आम्हाला आमचं कर्तव्य संपूर्ण क्षमतेसह पार पाडायचं असेल तर आमचं, आरोग्य सुरक्षित असणं आवश्यक आहे. विशेषत: आमच्या महिला अधिकाऱ्यांसाठी तर ही गोष्ट अधिकच गरजेची आहे. त्या नोकरी आणि घर अशा दोन्ही गोष्टी सांभाळतात.
डॉ.गोरे म्हणाले दंतचिकित्सा करण्यात सर्वांत मोठा अडथळा म्हणजे दवाखान्यात उपचार घेताना होणाऱ्या वेदनेची भीती. पण आता नवीन तंत्रज्ञान उपलब्ध झाले असून, रुग्णानी चिंता करू नये.त्यासाठी उपचार करून तपासणी करून घ्यावी.

Post a Comment

0 Comments