आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
श्रीरामपूर - अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येत असलेला जिल्हास्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार कोल्हार भगवतीपुर येथील दैनिक लोकमंथन व एस नाईन न्यूज चॅनल चे प्रतिनिधी ,शिवचरित्र व्याख्याते पत्रकार साईप्रसाद प्रमोद कुंभकर्ण यांना घोषित झाला आहे. दि. 6 जानेवारी म्हणजे पत्रकार दिनाच्या दिवशी शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव येथील श्रीराम विद्यालयाच्या प्रांगणात या पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले ,सदस्या हर्षदाताई काकडे, प्रांताधिकारी देवदत्त केकान,पोलिस उपाधीक्षक मंदार जावळे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींची दखल घेऊन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो.
साईप्रसाद प्रमोद कुंभकर्ण यांनी आज पर्यंत विविध वृत्तपत्रातून,साप्ताहिकातून तसेच मासिकातून गड-किल्ले ,इतिहास विषयक लिखाण प्रसिद्ध केले आहे. कोल्हार भगवतीपूर येथील दैनिक पुढारीचे पत्रकार प्रमोद मधुकर कुंभकर्ण यांचे ते चिरंजीव व क्रीडा विषयक लिखाण करणारे पत्रकार गणेश कुंभकर्ण यांचे बंधू आहेत.
0 Comments