Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चिंचपूर पांगुळ अरुंद घाट रस्ता शेतकऱ्यांसाठी अडचण नसून खोळंबा
घाट रस्ता रुंदीकरणाची शेतकऱ्यांची मागणी
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर /बाबा ढाकणे
अहमदनगर - पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ या गावासह चार ते पाच गावाच्या दळणवळणासाठी एकमेव घाट रस्ता आहे. हा घाट रस्ता अरुंद असल्याकारणाने जडवाहतुकीस मोठा अडथळा ठरत आहे. शेतमाल वाहतुकीदरम्यान, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते असल्याकारणाने चिंचपूर पांगुळ अरुंद घाट रस्तेचे रुंदीकरण करावेत, अशी जिल्हा प्रशासनाकडे चिंचपूर पागुंळ पंचक्रोशीतून होते आहे.
चिंचपूर पांगुळ येथे बेलपार धरण आहे. पाण्याची सुविधा असल्याने येथील शेतकरी हा ऊसपिकाकडे वळला आहे. परंतु हे ऊस पिक काढल्यानंतर ती वाहतूक करण्यासाठी हा अरुंद घाट रस्ता मोठ्या वाहनांसाठी मोठा अडथळा आहे. यात मोठ्या वाहनांचे अपघात झाले असून, यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान यापूर्वी झाले आहे. यामुळे विशेषतः चिंचपूर पांगुळ परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी या वाहतुकीच्या अडथळ्याने त्रस्त आहेत. घाट रस्त्याचे रुंदीकरण झाल्यास चिंचपूर पांगुळ, वडगाव, जोगेवाडी, मानेवाडी, ढाकणवाडी या परिसरातील ऊसासह अन्य शेतीमाल सुस्थितीत व कोणतेही नुकसान न होता, तालुक्याच्या ठिकाणी जाऊ शकतो. परंतु मोठ्या महनतीने पिकविलेला माल अरुंद घाट रस्त्यामुळे वाहतूक दराकडून चिंचपूर पागुंळ परिसरातील शेतमाल वाहतुकीस नकार दिला. शेतीमाल वेळेत बाजारात न गेल्याने यात शेतकऱ्यांचेच नुकसान होते. या सर्व कारणास्तव चिंचपूर पांगुळ रस्ता रुंदीकरण व्हावेत, अशी मागणी चिंचपूर पांगुळ पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments