Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पोलीस रेझिंग डे च्या निमित्ताने छावणी परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी हाताळली शस्रेआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
भिंगार : एरवी पोलीस दादांचे नाव घेताच भितीने थरकाप उडणा-या मुलींना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीसांच्या नियमित वापरातील शस्रास्रे प्रत्यक्ष हाताळण्याबरोबरच पोलीस दलाचे कामकाज कसे चालते हे जवळून पाहण्याची संधी भिंगार कँम्प पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरिक्षक प्रवीण पाटील यांनी उपलब्ध करून दिली. निमित्त होते पोलीस रेझिंगडे प्रसंगी मुलींशी संवाद साधण्याचे. कॉन्सटेबल राहुल द्वारके यांनी शस्रास्रांची माहिती दिली. 

 पाटील पुढे म्हणाले, भारताचे तत्कालीन प्रधान मंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दि. २ जानेवारी १९६१ रोजी मुंबई येथे महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान करून महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना केली होती. तेव्हापासून महाराष्ट्रात दरवर्षी २ जानेवारी रोजी पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने रेझिंग डे साजरा केला जातो. 
महिला सुरक्षा जनजागृती, सर्व धर्म समभाव आणि जातीय सलोखा मार्गदर्शन, शाळा महाविद्यालयात जावून विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा, वाहतूक नियम, कायदा सुव्यवस्था या बाबतची माहिती पोलीस स्थापना सप्ताहाच्या निमित्ताने देण्यात येते. 
याप्रसंगी मुख्याध्यापिका आशालता बेरड,संजय शिंदे,हेड कॉन्सिटेबल मोहिनी कर्डक,राजेद्र सुद्रिक,सचिन धोंडे,सपना तांबे,सुभाष भारूड,स्नेहल लवांडे,संध्या पाटकुळकर,प्रिया सोनाग्रा आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments