Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सावित्रीबाई फुले जयंती दिनी राष्ट्रीय महिला खेळाडूंचा गौरवआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील राष्ट्रीय खेळाडू असलेल्या युवतींचा गौरव करुन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, नगरसेवक प्रकाश भागानगरे, महिला जिल्हाध्यक्षा रेशमा आठरे, माजी उपमहापौर दिपक सुळ, ओबीसी सेलचे अमित खामकर, बाबासाहेब गाडळकर, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, अमोल कांडेकर, उषा सोनटक्के, सायरा शेख, सुरेखा कडूस, शितल राऊत, परेश पुरोहित, अजय दिघे, राजेश भालेराव, दिपक खेडकर, मयुर जोशी, लहू कराळे, प्रा.बबनराव गाडेकर, धीरज पोखरणा, संगिता कडूस, लता गायकवाड, संगिता सुकाळकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आ.संग्राम जगताप म्हणाले की, महिलांच्या हातात लेखणी देऊन सावित्रीबाईंनी क्रांती घडवली. आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहे. सावित्रीबाईंनी महिलांना खर्‍या अर्थाने जगण्याची दिशा दिली. युवतींसाठी कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात देखील प्रोत्साहन देण्याचे काम केले जाणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. प्रा.माणिक विधाते यांनी समाजात एका महिलेने शिक्षणाच्या बळावर क्रांती घडवली. अत्यंत बिकट परिस्थितीत फुले दांम्पत्यांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन समाजाला दिशा दिली. महिलांना शिक्षणाची दारे उघडे करुन देणार्‍या सावित्रीबाईंमुळे महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर मजल मारणार्‍या सावित्रीच्या लेकींचा गौरव करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार जगताप यांच्या हस्ते निहारिका नवले, तन्वी शेंडकर, चंचल लाड, गायत्री नागे, साक्षी साठे, स्नेहल यळवंडे, प्रिती मगर, गौरी गागरे, मानसी बिंगी, पायल बडे, अंजली पोकळे, साक्षी पवार या राष्ट्रीय महिला खेळाडूंचा गौरव करण्यात आला.   

Post a Comment

0 Comments