Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गुलमोहर रोडवरील अपार्टमेंटमधील हायप्रोफाइल वेश्याव्यवसायावर छापाआँनलाईन न्यूज पोर्टल
नगर रिपोर्टर
अहमदनगर - गुलमोहर रोड येथील अपार्टमेटमध्ये हायप्रोफाईल वेश्या व्यवसायावर छापा टाकून एकास अटक केली असून एका परप्रांतीय मुलीची सुटका केली असल्याची घटना गुरुवार (दि.२) रात्री १० वा घडली.
प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विकास वाघ , पोलीस हवालदार निपसे ,पोलीस नाईक मिरपगार , पोलीस नाईक फसले ,पोलीस कॉन्स्टेबल लहारे, खरात , महिला पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड, भगत , सुद्रीक आदिंच्या पथकाने गुलमोहर रोड वरील अपार्टमेंटमध्ये छापा टाकून अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार 01 परप्रांतीय मुलीची सुटका करून कुंटणखाना चालवणारे अमर उर्फ़ विकी गोपालदास सोळुखे याचेवर स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3.4.5.7.8 प्रमाणे तोफखाना पोलीस पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

Post a Comment

0 Comments