Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अशोक तांबे, विजय गोबरे व निलेश आगरकर यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - सहारा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट पत्रकारिता हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ नगर तालुका संघटनेतील पदाधिकाऱ्यांना जाहीर करण्यात आल्याची माहिती 
सहारा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमोल भालसिंग यांनी दिली
सहारा प्रतिष्ठान यांच्या वतीने सामाजीक काम करणार्या पत्रकारांना प्रोत्साहन मिळण्यासाठी व त्यांचा सम्मान करण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात येते.
यावर्षी दिला जाणारा उत्कृष्ट पत्रकारिता हा पुरस्कार दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे पत्रकार अशोक तांबे,दैनिक लोकमंथनचे विजय गोबरे,व न्यूज टुडे २४ चे पत्रकार निलेश आगरकर यांना नुकताच जाहीर करण्यात आला असल्याची माहिती सहारा प्रतिष्ठाचे अध्यक्ष, संस्थापक अंबरनाथ भालसिंग ,नितीन तेलधने, सनी खंडागळे ,राहुल पाखरे यांनी दिली.पुरस्काराबाबत महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे व नगर तालुका अध्यक्ष तुकाराम कामठे ,खासेराव साबळे, जयसिंग यादव व संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments