Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

स्वच्छ सर्वेक्षणात नगरवासियांनी सहभागी व्हावेत - डॉ. अनिल बोरगेतक्रारींसाठी स्वच्छता ॲप डाउनलोड करा
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - केंद्र सरकारच्या पथकामार्फत शहरात होत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या जनजागृतीसाठी व नागरिकांनी स्वच्छतेचे मोबाईल ॲप डाउनलोडिंग करावेत, असे आवाहन अहमदनगर महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांनी केले आहे.
स्वच्छ सर्वेक्षणाबाबत नागरिकांनी दक्ष रहावे. स्वच्छता ॲप डाउनलोड करून कचऱ्याबाबत, स्वच्छता गृहांबाबत आपल्या परिसरातील समस्या, तक्रारीची माहिती ॲपवर टाकावी. स्वच्छता ॲपच्या वापरासाठीही महापालिकेला गुण दिले जाणार आहेत. ॲपवरील तक्रारी सोडविण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना केल्या जातील. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी स्वच्छता ॲप डाउनलोड करा.
या लिंकवरून ॲप डाउनलोड करू शकता 👉🏻
https://play.google.com/store/apps/details?id=com.ichangemycity.swachhbharat
सर्वेक्षणात नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी शहरातील घरघुती स्वरुपाच्या कचऱ्याचे घरातच ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करुन तो वेगवेगळ्या कचरा पेटीत साठवून ठेवावा. कचरा संकलन करण्यासाठी येणाऱ्या घंटागाडीमध्येच ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे टाकावा. ओला कचऱ्याचे घरीच कंपोस्टींग करुन खत तयार करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात सहकार्य करावे. सर्वेक्षणावेळी नागरिकांना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची सकारात्मक उत्तरे द्यावीत.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आपल्या महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये भाग घेतलेला आहे. या अंतर्गत "नागरीकांचा सहभाग" या घटकातील तपासणीसाठी केंद्र शासनाचे पथक ४ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२० दरम्यान आपल्याला फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून स्वच्छ सर्वेक्षण २०२० संदर्भात सात प्रश्न विचारणार आहे. या प्रश्नांची नागरीकांनी सकारात्मक उत्तरे देवून आपल्या शहराला स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये जास्तीत जास्त गुणांकन मिळवून देण्यास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत महापालिकेकडून उपाययोजना सुरू आहेत. मनपा पदाधिकारी व अधिकारी परिणामकारक अंमलबजावणीसाठी प्रयत्न करत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून मागील दोन तिमाहीच्या रँकिंगमध्ये दहा लाखांच्या आत लोकसंख्या असलेल्या शहरांच्या क्रमवारीमध्ये नगर शहराचा देशातील पहिल्या शंभर स्वच्छ शहरांमध्ये क्रमांक आला आहे.
स्वच्छता सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर महानगरपालिकेकडून शहरांमध्ये स्वच्छताविषयक उपाययोजना केल्या आहेत. शहरात घर ते घर कचरा संकलन व वाहतूकीसाठी खासगीकरणातून काम सुरु करण्यात आले आहे. तसेच मोकळ्या भूखंडावरील कचरा उचलण्यासाठी, कायम कचरा टाकल्या जाणाऱ्या जागांवर स्वच्छता राखण्यासाठी उपाययोजना सुरु आहेत. स्वच्छता ॲपचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. होम कंपोस्ट प्रकल्पासाठी महापालिका कर्मचाऱ्यांच्या पुढाकारातून जनजागृती सुरु आहे. 
काही स्वयंसेवी संस्था, शाळा, बचत गट आदींचा सहभाग वाढविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या कामात सुधारणा होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले आहे. त्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या सर्व उपाययोजनांसह नागरिकांकडूनही प्रतिसाद मिळत असल्याने स्वच्छता रँकिंगमध्ये सुधारणा होण्यास सुरुवात झाली आहे.
पहिल्या टप्प्यात झालेल्या ओडीएफ सर्वेक्षणात मनपाला ओडीएफ प्लस दर्जा मिळाला आहे. मागील दोन तिमाहीमध्ये स्वच्छता विषयी उपाययोजना प्रत्यक्ष अंमलबजावणी यात सुधारणा होत असल्याने देशातील दहा लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पहिल्या शंभर स्वच्छ शहरांमध्ये नगरचा समावेश झाला आहे. पहिल्या तिमाहीत नगर शहर 78 व्या क्रमांकावर होते. तर दुसऱ्या तिमाहीत नगर शहर 96 या क्रमांकावर असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या निकालातून समोर आले आहे. सर्वेक्षणातील प्रमुख टप्पा असलेल्या 'थ्री स्टार' रँकिंगसाठी जानेवारी महिन्यात सर्वेक्षण होणार आहे. उपाययोजनांमध्ये सातत्य राहिल्यास व शहरातील स्वच्छतेमध्ये आणखी सुधारणा झाल्यास सर्वेक्षणाच्या अंतिम निकालातही नगर शहराचा पहिल्या शंभर शहरांमध्ये समावेश होऊ शकतो, असे डॉ बोरगे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments