Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहातआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी - तालुक्यातील वडगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी कवायत,भाषणामध्ये सहभागा घेऊन गाणी, नृत्यात कला सादर केल्या. यावेळी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत, विद्यार्थ्यांवर बक्षिसांचा वर्षाव केला.
दरम्यान, वडगाव विकास निधी या ग्रुपतर्फे खालील बक्षिसे देण्यात आली आहुजा साउंड सिस्टिम अंदाजे किंमत (1,5000), वाचन स्टँड 3,800 रुपये, तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा विजेत्या मुलांना ट्रॉफी आणि मेडल, इसरो सहलीसाठी निवड झालेल्या मुलीला साहित्य खरेदीसाठी 2,500 रुपये, वाचन प्रकल्पसाठी 1000 रुपये आणि प्रत्येक वर्गातील एका विद्यार्थ्यांला कंपास आणि पॅड.
ग्रामपंचायत कार्यालय वडगाव यांचेकडून 2 अँड्रॉईड स्मार्ट टीव्ही, शिवाली साठी केंद्रातील शिक्षकांकडून 1,200 रुपये (इस्त्रो निवड), चंद्रकांत जयभाये सर यांचेकडून शिवाली साठी 500 रुपये,
अजिनाथ बडे यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना पेन, पुस्तक वाटप, तसेच शिवाली सातपुते हिचा सत्कार करण्यात आला.
भाषण आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी अनेक विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. यावेळी वडगाव विकास निधी सदस्य, वडगाव ग्रामपंचायत पदाधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदिसह ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments