Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

डोळ्यात मिरची पूड टाकून दरोडा टाकणारी टोळी जेरबंद ; एलसीबीची कारवाईराहाता तालुक्यातील सोनारसह पाच फरार

आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर - सोनाराच्या सांगण्यावरुन सोनाराच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून दरोडा टाकणाऱ्या टोळीतील चारजणाना पकडण्यात आले असून उर्वरित राहाता तालुक्यातील सोनारसह पाचजण फरार झाले आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
पकडण्यात आलेल्यामध्ये निखिल शशिकांत रणनवरे (वय २१, रा.टाकळीभान, ता.श्रीरामपूर, जि.अ.नगर), सोहेल जुबेर शेख (वय २१, रा.फातेमा सो. वार्ड नं.१ श्रीरामपूर), आवेज उर्फ बाबा जुबेर शेख (वय २३, रा. फातेमा सो.वार्ड नं.१, श्रीरामपूर), मतीन गुलाब पठाण ( वय २० रा.बेलपिंपळगाव, ता.नेवासा, जि.अ.नगर) ही चारजण आहेत. उर्वरित शाहरुख सांडू सय्यद (रा.चाँदनगर, बेलापूर, श्रीरामपूर), गौरव बारकू अवसरमल (रा.टाकळीभान, श्रीरामपूर), प्रकाश उर्फ भावड्या भिमराव रणनवरे (रा.टाकळीभान, श्रीरामपूर), आलिशा अजीज शेख (संजयनगर, श्रीरामपूर), सोनार विजय उर्फ बब्बू रामकृष्ण देडगांवकर (रा. कोल्हार ता.राहाता, जि.अ.नगर) ही सर्वजण फरार आहेत.

Post a Comment

0 Comments