Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

खंडणी, अपहरण व दरोडा घालणारी टोळी गावठी कट्ट्यासह जेरबंद ; एलसीबीची कारवाईआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - खंडणीसाठी अपहरण करणे, दरोडा घालणाऱ्या टोळी गावठी कट्ट्यासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेस २४ तासाच्या आत यश आले आहे.
राजेंद्र गंगाधर मुंगसे (वय ३०, रा.बोल्हेगाव गावठाण, अहमदनगर), ओंकार शंकर गुंजाळ (वय २२, रा.मगरवस्ती बेकारी, वाघोली,ता.हावेली जि.पुणे), अमन दस्तीगर पटेल (वय २० रा. गाडेवस्ती, बेकारी फाटा, वाघोली,ता.हावेली जि.पुणे), ईशाप्पा जगन्नाथ पंदी (वय २०, बेकारी फाटा, वाघोली,ता.हावेली जि.पुणे) व एक अल्पवयीन मुलगा ताब्यात घेतले आहे. तर गणेश बाबा चव्हाण (केसनंद ता.हावेली ता.पुणे) याचा पोलीस शोध घेत आहेत. पकडण्यात आलेल्या आरोपींकडून २० हजार ४०० रुपये किंमतीचा गावठी कट्टा, १ हजार रुपयांचे छाऱ्याचे पिस्टल, २० हजार रुपये किंमतीचे ६ ग्रँमची सोन्याची अंगठी, २ हजार रोख रक्कम व १ लाख रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे सात मोबाईल असा एकूण १ लाख ४३ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, नगर ग्रामीण विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पो.नि.दिलीप पवार यांच्या सूचनेनुसार एलसीबी पथकातील सपोनि शिरिषकुमार देशमुख, पोहेकाँ बाळासाहेब मुळीक, सोन्याबापू नानेकर, पोना दीपक शिंदे, रविंद्र कर्डिले, विजय ठोंबरे, संदीप पवार, राहुल सोंळुके, सागर सुलाने, रोहित मिसाळ, सागर ससाणे, मयूर गायकवाड, दिगंबर कारखिले, चालक पोहेकाँ संभाजी कोतकर यांनी कारवाई केली.

Post a Comment

0 Comments