Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर येथे पालकमंत्री हसन मुश्रिफ यांच्या हस्ते ध्वजारोहण


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडीओ
अहमदनगर - प्रजासत्ताक दिनाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार सकाळी अहमदनगर पोलीस मुख्यालय या ठिकाणी पालकमंत्री हसन मुश्रिफ यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जि.प.अध्यक्षा राजश्रीताई घुले, उपाध्यक्ष शेळके, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील आदिंसह पोलीस, महसूल, जिल्हा परिषदेसह अन्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, पोलीस दलच्या विविध विभागांनी संचालन केले. पालकमंत्री मुश्रिफ यांच्या हस्ते जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त पोपट पवार, झहीर खान व राहिबाई पोपरे यांच्या सत्कार झाला. तसेच पोलिस दलामध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांच्या सह २१ पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. नगर शहरातील शाळेतील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. आरोपींचा पाठलाग करून पकडण्याचे पोलिसांनी प्रात्यक्षिके करून दाखवली.Post a Comment

0 Comments