आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर : २६ जानेवारी १९५० पासून भारतीय संविधान अंमलात आले.त्या संविधानाबद्दल नागरिकांमध्ये जाणीवजागृती व्हावी. घटनेतील न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता ही मुलतत्वे बालमनावर रूजावीत व विद्यार्थ्यांना संविधानाने दिलेले हक्क व कर्तव्य समजावीत त्यामधून सुसंस्कृत नागरिक तयार व्हावेत.
याच उद्देशाने छावनी परिषद शाळेच्यावतीने संविधान दौडचे आयोजन करण्यात आले होते.जॉगिंग पार्क येथून माजी प्राचार्य कैलास मोहिते व मुख्याध्यापिका आशालता बेरड यांचे हस्ते झेंडा उंचावून दौडचे उदघाटन करण्यात आले.
या दौडमधून मुलांमध्ये रेहान शेख, वनित चव्हाण, कुणाल श्रीमंदिलकर तर मुलींमध्ये अनुष्का दिवाण, हेमलता सोनटक्के, माधवी दिवाण या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले.या दौडमध्ये मोठ्या संख्येने मुलांनी सहभाग नोंदविला होता.
0 Comments