Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

लोकांना पर्याय हवा असून, तो वेगळा पर्याय निर्माण होऊ शकतो हे महाराष्ट्राने दाखवून दिला ः शरद पवार


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर ः  लोकांना पर्याय हवा असून,  तो वेगळा पर्याय निर्माण होऊ शकतो हे महाराष्ट्राने दाखवून दिला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही मला पत्र पाठवून विरोधी पक्षाची बैठक बोलावण्याची विनंती केली आहे. अन्य पक्षांच्या लोकांशी चर्चा करून त्याबाबतचा निर्णय घेऊ, असे पत्रकारांशी  अहमदनगर येथे बोलतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधक एकवटणार आहेत, असे संकेत त्यांनी
दिले.
पवार पुढे म्हणाले की, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची प्रतिक्रिया वाचण्यात आली. महाराष्ट्र व पवारांनी जो निर्णय घेतला त्यातून प्रेरणा मिळाल्याचं सोरेन म्हटले होते. आम्ही जो निर्णय घेतला असा निर्णय इतर राज्यांनीही घेतला पाहिजे. लोक पर्याय शोधत आहेत. त्यांना पर्याय पाहिजे आहे. कुठलाही एखादा पक्ष पर्याय देईल, अशी अवस्था आज नाही. यामुळे किमान समान कार्यक्रमावर पर्याय देता येऊ शकतो, तो लोकही मान्य करतात.  किमान समान कार्यक्रमावर आधारित पर्याय लोकांना मान्य होईल, असा विश्वास  व्यक्त केला जात आहे, असे शेवटी पवार म्हणाले.

Post a Comment

0 Comments