Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

स्व.मुंडे साहेबांच्या 'वरळी' येथील कार्यालय उदघाटनाच्या तारखेत बदल

उदघाटन आता २६ जानेवारी ऐवजी ५ फेब्रुवारी रोजी

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
मुंबई - लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या वरळी येथील कार्यालय नव्याने पुन्हा सुरू करण्यात येत आहे. या कार्यालयाच्या उदघाटनाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता हे उदघाटन २६ जानेवारी ऐवजी ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे, अशी माहिती माजीमंत्री पंकजाताई मुंडे यांनी दिली.

वरळीच्या 'शुभदा' बिल्डींग मधील कार्यालय परत सुरू करण्याची तारीख २६ जानेवारी ठरवली होती पण सरपंच, जिल्हा परिषदेचे सदस्य, लोकप्रतिनिधी व सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाने ही तारीख पुढे ढकलली आहे. आता उदघाटन ५ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ११ वाजता ठरवले आहे, असे मुंडे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments