Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

टंकलेखन परीक्षेत तोतया विद्यार्थी ; ८ जणांवर गुन्हा दाखलआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - मराठी विषयाच्या संगणक टंकलेखन परीक्षेमध्ये तोतया विद्यार्थी असल्याचा नुकताच अहमदनगर येथे उघडकीस आला. याप्रकरणी परीक्षा केंद्र संचालक जयश्री कार्ले यांच्या फिर्यादीवरुन ८जणांविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष मारुती चौरे, आदीनाथ नामदेव सोलट, युवराज रामदास सुळे, मयुर चंद्रकांत घोडके, मोरेश्वर दिलीप गीते, तेजस जालिंदर बोरुडे, प्रवीण अर्जुन गाडेकर आदिंचा दाखल गुन्ह्यात समावेश आहे.
सरकारी कामात अडथळा आणणे, जाणिव पूर्वक संगनमताने फसवणूक करणे, या कलामान्वये ८ जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दाखल गुन्ह्यात संतोष चौरे, आदिनाथ सोलट, नवनाथ सोलट, युवराज सुळे या चार जणांना अटक केली आहे. 

Post a Comment

0 Comments