Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिर्डी रविवारीपासून बेमुदत बंद ; शिर्डीकरांचा ग्रामसभेत निर्णय


भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले राहणार

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शिर्डी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरी (जि.परभणी) येथील साईबाबांच्या जन्मभूमी विकास आराखड्यास १०० कोटी रुपयांचा निधी दिल्याने साईबाबाच्या जन्म स्थळावरुन पाथरी व शिर्डी ग्रामस्थांमध्ये वाद सुरू झाला आहे. या पाश्वभूमीवर शनिवारी (दि.१८) सायंकाळी शिर्डी ग्रामस्थांनी ग्रामसभा बोलवून घटनेचा निषेध करून रविवारी (दि.१९) शिर्डी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय शिर्डी ग्रामस्थांनी घेतला आहे.


दरम्यान शिर्डी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी च्यावतीने श्री साईबाबा समाधी मंदिरातील दर्शन, मंदिरातील सर्व आरत्या व सर्व धार्मिक विधी हे रविवारी (दि.१९)व त्यानंतर नियमितपणे सुरू राहणार आहे. संस्थानचे श्री प्रसादलाय, सर्व भक्तीनिवास, रुग्णालय आदि सुविधा नियमितपणे सुरु असणार आहेत.
माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, शिर्डी ग्रामस्थांच्या निर्णय माझा पाठिंबा आहे. 

Post a Comment

0 Comments