Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिर्डी बेमुदत बंदला१०० टक्के प्रतिसाद ; भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले




आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / बाबा ढाकणे
शिर्डी - पाथरी गावाचा साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य मागे घेत नाही, तोपर्यंत शिर्डी आज (रविवार दि.१९) पासूनच्या बेमुदत बंदला शिर्डीकरांनी १०० टक्के प्रतिसाद दिल्याने शिर्डी शहरात सकाळपासून शुकशुकाट आहे.
पाथरी जन्मस्थळाबाबत पाथरीकरांनी केलेले सर्व दावे तथ्यहीन व भाविकांची दिशाभूल करणारी आहेत. पाथरीला निधी देण्यास विरोध नाही; मात्र तेथील जन्म स्थळाच्या उल्लेखाला आक्षेप असल्याचे शिर्डी करांनी स्पष्ट केले आहे. या शिर्डी बंद दरम्यान, साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे.
श्री साईबाबा समाधी मंदिरातील दर्शन, मंदिरातील सर्व आरत्या व सर्व धार्मिक विधी हे रविवारी (दि.१९)व त्यानंतर नियमितपणे सुरू राहणार आहे. संस्थानचे श्री प्रसादलाय, सर्व भक्तीनिवास, रुग्णालय आदि सुविधा नियमितपणे सुरु असणार आहेत.

Post a Comment

0 Comments