Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पोलीस दलातर्फे आयोजित निबंध (उर्दू माध्यम) स्पर्धेचा निकाल जाहीर

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - पोलीसांबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये संवेदनशीलता निर्माण व्हावी, आणि पोलीस व विद्यार्थीमध्ये जवळकी वाढावी, या हेतूने पोलीस स्थापन दिनाचे औचित्य साधून  जिल्हा पोलीस दलाच्या वतीने
घेण्यात आलेल्या शहरस्तरीय निबंध (उर्दू माध्यम) स्पर्धेचा निकाल जाहीर केला आहे.

निबंध (उर्दू माध्यम) स्पर्धेत १ली ते ४ थी या गटात शेख उमहानी अकबर अली (आयडीयल उर्दू प्रायमरी स्कूल), शेख सुफियान उस्मान (अली पब्लिक स्कूल), शेख झैनाब वसीमअहमद (सावित्रीबाई उर्दू स्कूल). ५ वी ते ८ वी गटात - पठाण टस्कीन गुलजार हुसेन (चाँद सुलतान हायस्कूल), आशना जोया फिरोज (मौलाना आझाद उर्दू गर्ल्स हायस्कूल), खान हयुमेरा अब्दुल मलिका ( आयडीयल उर्दू प्रायमरी स्कूल). ९ वी ते १२ वी गटात - रिमशा अहाना फिरोज (मौलाना आझाद उर्दू गर्ल्स हायस्कूल), सौदगार सानिया हुडा रिजवान (चाँद सुलतान हायस्कूल), सय्यद सानिया शफिका ( चाँद सुलतान ज्युनिअर काँलेज) आदि विद्यार्थ्यी विजयी झाले आहेत. या सर्व विजयी विद्यार्थ्यांचे प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, नगर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके आदिसह अन्य अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
या निबंध स्पर्धेसाठी नगर शहरातील शाळा, काँलेजमधील ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

Post a Comment

0 Comments