Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नाथरा येथे भरगच्च कार्यक्रमांनी ५ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचा समारोप



साहित्य रसिकांची प्रचंड उपस्थिती ; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा संमेलनात झाला गौरव
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
परळी वैजनाथ - 17 जानेवारी रोजी सुरु झालेले दोन दिवसीय पाचवे नाथरा येथील ग्रामीण मराठी साहित्य संमेलन भरगच्च कार्यक्रमांनी व साहित्य रसिकांच्या प्रचंड उपस्थितीत पार पडले. प्रसिध्द साहित्यिक प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांच्या हस्ते 17 जानेवारी रोजी तालुक्यातील नाथरा येथे उद्घाटन झाले. तर दुसर्‍या दिवशीय महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करणार्‍या गुणवंत्तांचा साहित्य संमेलनाच्या वतीने पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
नाथरा येथील पापनाथेश्वर विद्यालयाच्याय प्रांगणात पाचव्या ग्रामीण मराठी सहित्य संमेलनाचे उद्घाटन सकाळी 11 वाजता प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांच्या हस्ते झाले. त्यापूर्वी नाथरा येथे ग्रंथदिंडी काढण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे म्हणाले की, ग्रामीण भागातील या साहित्य संमेलनामुळे निश्चितच नवलेखकांना प्रोत्साहन मिळेल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीनाथ मानव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ.एकनाथ मुंडे हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.संतोष मुंडे, बीड येथील साहित्यिक अनंत कराड, प्राचार्य विधाते, कवी रंगनाथ मुंडे, पाटोदाचे प्रा.डॉ.महादेव मुंडे, नागनाथ बडे, मुख्याधिपिका सुलेखा कराड, अ‍ॅड.शुभांगी गित्ते, व्याख्याते चंद्रकांत हजारे आदी मान्यवर उपस्थित होते. सौ.कमलबाई मुंडे यांनी संमेलनाच्या आयोजनासाठी महत्त्वाची भुमिका निभावली.
उद्घाटनानंतर दुपारच्या सत्रात ज्येष्ठ कवी रंगनाथ मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन उत्साहात झाले. या कवी संमेलनात नागनाथ बडे, केशव कुकडे, बालाजी कांबळे, अनंत मुंडे, प्रा.राजकुमार यल्लावाड, दत्ता वालेकर, सतू जाधव, वामन जयवीर, सिध्देश्वर इंगोले, दिवाकर जोशी, रमेश मोटे, विश्वांभर वराट, रामकिशन केकाण, प्रा.सौ.चेतना गोर शेट्टे, सौ.सुनिता कोमावांर, विजयाताई दहिवाळ, सुचिता करमाळकर, पल्लवी निर्मळे आदींनी आपल्या उत्कृष्ट कविता सादर केल्या.
दुसर्‍या दिवसीय सकाळी कथाकार भास्कर बडे यांनी पाचव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात आपले विचार मांडले. यावेळी त्यांनी साहित्य संम्मेलनाचे संयोजक डॉ.एकनाथ मुंडे यांचे विशेष अभिनंदन केले व ही परंपरा कायम पुढे चालु ठेवावी असे आवाहन केले. समारोप करतांना डॉ.एकनाथ मुंडे यांनी ग्रमिण साहित्य हे किती महत्वाचे बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यावरुन लक्षात येते असे सांगितले. डॉ.संतोष मुंडे यांनी या आमच्या विद्यालयातून निश्चित उद्याचे साहित्य तयार होतील. कार्यक्रमात सौ.सुलेखा कराड यांनी आमचे आण्णा लेहिले हे पुस्तक तर डॉ.एकनाथ मुंडे लिखित इछापूर्तीश्वरनाथ जागृत महादेवा विषयीचे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. शेवटच्या सत्रात पापनाथेश्वर माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहंसंमेलन पार पडले. या संमेलनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ.एकनाथ मुंडे यांनी केले. या संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलाकुणांना वाव मिळतो असे ते म्हणाले. यावेळी ज्येष्ठ भागवत मुंडे, देवराव कदम, पैलवान मुरलधीर मुंडे, सुर्यकांत मुंडे, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अनंत गित्ते, प्रशांत जोशी, रानबा गायकवाड, धिरज जंगले, धनंजय आढाव, मोहन व्हावळे, धनंजय आरबुने, जगदिश शिंदे, महादेव गित्ते, प्रशांत कराड, मुक्ताराम कराड, विनायक कराड, अशोक पाटील, प्रकाश मुंडे, मेघराज मुंडे, राजेभाऊ मुंडे, गणेश मुंडे, रामधन पारवे, पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीनाथ मानव सेवा मंडळाच्या वतीने साहित्य भूषण, समाजभूषण, कलाभूषण, पत्रकार भूषण, शिक्षण भूषण, कुस्तीभूषण, अभियंता भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी राज्यभरातील सुमारे चाळीस पुरस्कार विजेते उपस्थित होते. समारोप प्रसंगी पुरस्कार विजेत्यांचे मनोगत सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश काळे तर आभार मुख्याधिपिका सौ.सुलेखा कराड यांनी मानले. या कार्यक्रमास साहित्य रसिक, विद्यार्थी, पालक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments