आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - ईदगाह मैदानावर एनआरसी व सीसीए ला विरोध व निषेधासाठी सभा होणार आहे. या कारणास्तव सोमवारी (दि.२०) मैदानामार्गे येणारे रस्ते रहदारीसाठी बंद ठेवले आहे. वाहनधारकांनी पर्याय मार्गाचा वापर करावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी केले आहे.
नागरिक सुधारणा कायदा एनआरसी, सीसीए ला विरोध व निषेधासाठी अहमदनगर शहरातील ईदगाह मैदानावर सभा होणार आहे. या दरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राहून कोणताही अनुचित प्रकार घडू नयेत, व वाहतुकीस अडचण येऊ नयेत, यासाठी ईदगाह मैदानामार्ग येणारे रस्ते सोमवार (दि.२०) बंद ठेवले आहेत. रहदारीसाठी पर्यायी रस्ते मार्ग जावे लागणार आहे. १) एसपीओ चौक, जिल्हा न्यायालय, बेल्हेश्वरचौक, किल्ला चौक, जीपीओ चौक, चांदणी चौक २) जीपीओ चौक, किल्ला चौक, बेल्हेश्वरचौक, जिल्हा न्यायालय, एसपीओ चौक या मार्गे पुणे, सोलापूर, औरंगाबाद आणि मनमाड येणाऱ्या रहदारीस जात येणार आहे.
0 Comments