Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगरवासियांनी स्वच्छतेसाठी आपलं शहर म्हणून स्वच्छतेत सहभाग घ्यावा - महापौर बाबासाहेब वाकळे

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - अहमदनगर शहरातील प्रत्येकाने स्वच्छतेसाठी आपलं शहर म्हणून सहभाग घ्यावा, तो घेतल्यास नगर शहराचा नक्कीच चेहरामोहरा बदल्याशिवाय राहणार नाही. आपलं शहर सुंदर आनंदमयी राहिल, यासाठी सर्व शहरवासीयांनी सहभागी व्हावेत, असे आवाहन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले आहे.

श्री.वाकळे पुढे म्हणाले की, अहमदनगर महापालिकेस ओडिएम प्लस हा नामाकंन मिळाला आहे. आपले स्वच्छतेबाबत चांगले काम असल्याने 'ओडिएम प्लस प्लस' नामकंन १०० टक्के मिळणारच असल्याचा विश्वास 'नगर रिपोर्टर'शी बोलताना व्यक्त करीत ते पुढे म्हणाले की, यानंतर 'थ्रीस्टार' मध्येही अहमदनगर शहर ( महापालिका) सहभागी झालेली आहे. अहमदनगर शहराला स्वच्छतेसाठी ११ कोटी रुपयांचे बक्षिस मिळणार आहे. अहमदनगर शहरातील सर्व नागरिकांच्या, महापालिका कर्मचारी वर्ग, शाळेतील मुख्यध्यापक, विद्यार्थी, डॉक्टर्स, इंजिनिअर आणि विचार क्षेत्रातील मान्यवरचा सहभाग घेऊन अहमदनगर शहरामध्ये मोठे स्वच्छतेचे काम चालू केले आहे. पुणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी दोन महिन्यांपासून स्वच्छतेसाठीच्या उपाय योजना करीत आहेत. 

Post a Comment

0 Comments