Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीतर्फे साहित्य संमेलनात पोलीसांनी पत्रकारांची अडवणूक करुन धक्काबुक्की केल्याचा निषेध

संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने उस्मानाबाद येथे मराठी साहित्य संमेलनात पत्रकारांची अडवणुक करुन पोलीसांनी एका खासगी (झी 24 तास) वृत्तवाहिनीचे प्रतिनिधीस केलेल्या धक्काबुक्कीचा जिल्हाधिकारी कार्यालया समोर निषेध नोंदविण्यात आला. तर संबंधीत पोलीसांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना देण्यात आले. 

यावेळी कृती समितीचे जिल्हा निमंत्रक मन्सूर शेख, लैलेश बारगजे, रोहित वाळके, बंडू पवार, अन्सार सय्यद, बाबासाहेब ढाकणे, मोहसीन सय्यद, संजय सावंत, साजिद शेख, वाजिद शेख, प्रदिप पेंढारे, मयुर नवगीरे, संतोष आवारे, शुभम पाचरणे, शब्बीर सय्यद, दिपक कासवा, अमीर सय्यद, विक्रम बनकर, निलेश आगरकर आदी पत्रकार, वृत्त छायाचित्रकार, माध्यमांचे प्रतिनिधी व डिजीटल पोर्टलचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात सर्व अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकार, वृत्त छायाचित्रकार, माध्यमांचे प्रतिनिधी व डिजीटल पोर्टलचे प्रतिनिधी उस्मानाबाद येथे एका खासगी (झी 24 तास) वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी असलेले पत्रकार मुस्ताक मिर्झा यांना उस्मानाबाद येथे मराठी साहित्य संमेलनात पोलीसांकडून झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध करीत आहोत. पत्रकार हा लोकशाही प्रक्रियेमधील महत्त्वाचा घटक असून, समाजातील घडलेल्या घटनांना तो उजाळा देत असतो. तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वच पत्रकार पोलीस प्रशासनाला सहकार्य करीत असतात. मात्र पोलीसांकडून राज्यात पत्रकारांना शिवीगाळ, मारहाण व धक्काबुक्कीचे प्रमाण वाढत चालले आहे. पत्रकार हा जनसमुदायाचा भाग नसून, पत्रकारांना अपमानास्पद वागणुक देऊन त्यांना धक्काबुक्की करणार्‍या पोलीसांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याचे निर्देश भारतीय प्रेस कौन्सिलने देशातील सर्व राज्य सरकारला दिले असल्याचे म्हंटले आहे.
उस्मानाबाद येथे सुरू असलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विविध कार्यक्रमांचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना अरेरावी करत पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. तसेच या गोंधळाचे वार्तांकन करत असलेल्या पत्रकारांना पोलिसांनी अरेरावी केली. तर एका खासगी (झी 24 तास) वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी असलेले पत्रकार मुस्ताक मिर्झा यांना पोलिसांनी धक्काबुक्की करून बाहेर काढले. माध्यम हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, पोलीस प्रशासनाकडून अशा घटना वारंवार घडणे ही निषेधार्ह आहे. तातडीने संबंधीत पोलीसांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदनाद्वारे राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments