Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जि. प.च्या समाज कल्याण समिती सभापतीपदी परहर उमेश भगवान, महिला व बालकल्याण सभापती मिरा पाडुरंग शेटे आणि दोन विशेष समित्यांसाठी सुनिल गडाख व काशिनाथ दाते बिनविरोध निवडआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समिती सभापती पदी परहर उमेश भगवान व महिला व बालकल्याण सभापती मिरा पाडुरंग शेटे आणि दोन विशेष समित्यांसाठी सुनिल गडाख व काशिनाथ दाते यांची मंगळवार (दि.१४) यांची बिनविरोध निवड झाली.
समाजकल्याण समिती सभापती पदासाठी परहर उमेश भगवान व सोमीनाथ पाचारणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी मिरा पाडुरंग शेटे, दिपाली पंचशील रमेश, सुषमा बाजीराव दराडे, राणी निलेश लंके आदिंनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
दोन विशेष समित्यांच्या सभापती पदासाठी सुनिल विश्वासराव गडाख (दोन), काशिनाथ दाते (दोन), जालिंदर गंगाधर वाकचौरे, रामहरी कातोरे, अनिल संताराम कराळे, शरद मधुकर झोडगे, शरद मोहनराव नवले आदींनी ९ उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
सभा सुरु होण्यापूर्वीच विरोधी गटाच्या माजी जि.प. अध्यक्षा शालिनीताई विखे पा. याच्यासह अन्य सदस्यांनी सभागृहात हजेरी लावली होती. यावेळी भाजप पक्षाच्या वतीने व्हिप बजाविण्यात आला.

Post a Comment

0 Comments