Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

साईज्योती स्वयंसहाय्यता यात्रा - २०२० कार्यक्रमाचा समोरोपआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामविकास विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साईज्योती स्वयंसहाय्यता यात्रा - २०२० कार्यक्रमाचा सोमवारी (दि.१३) समोरोप झाला. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा राजश्री घुले होत्या. प्रमुख पाहुणे जि.प.उपाध्यक्ष प्रताप शेळके, अँड शारदा लगड, माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे, जि.प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर आदी उपस्थित होते. पाहुण्यांचा सत्कार अधिकारी तागड, वाबळे व साळवे आदींच्या हस्ते करण्यात आला.
दरम्यान, लंका पठारे (स्त्री शक्ती), शोभना सोनवणे (साई बचतगट) व मनिषा माळी (संत गोराबा) आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्ह्यातील १४ तालुक्यातील बचत गटांना प्रशिस्तपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये अकोला (साईस्वयंसहाय्यात), कोपरगाव (स्वराज्य), राहाता, अस्तगाव (वैभवी), राहुरी बु।। (मैत्री), श्रीरामपूर, शिरसगाव (जय), नेवासा, गोमाळवाडा (प्रगती), शेवगाव, तळणी (संत सावता), पाथर्डी, सुसरे (गौतमी मुखी), जामखेड, खर्डा (सहरा), कर्जत, पढारवाडी (स्त्री शक्ती), श्रीगोंदा, चिखली (तुळजाभवानी), पारनेर, जाधववाडी (डेक्यषी), नगर, शेंडी (प्रांजल).
यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी तागड, सहाय्यक अभियंता साळवे, लेखाधिकारी कांबळे, कार्यालयीन अधीक्षक चौसाळकर, सहाय्यक लेखाधिकारी बिचके आदीसह अन्य अधिकारी व कार्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा जि.प. अध्यक्षा घुले यांच्या हस्ते सत्कार झाला. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केला.  

Post a Comment

0 Comments