Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

प्रभारी अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृहचे दिपक पांडये यांच्या हस्ते शिपाई सुजाता शेळके यांचा सत्कारआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - मोठी जोखाम पत्कारुन आरोपीला पळून जाण्यास विरोध करताना जखमी झालेल्या जिल्हा कारागृहातील महिला शिपाई सुजाता शेळके यांचा प्रभारी अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह, सुधार सेवा, दिपक पांडये यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जिल्हा कारागृहात दिड वर्षापासून स्वयंपाक गृहात काम करणारा आरोपी स्वयंपाक गृहातील भाजी कापायची सुरी घेऊन सकाळी पावणे सहाच्या सुमारास कारागृहाच्या मुख्यद्वारात आला. तेथे कार्यरत असणाऱ्या महिला शिपाई सुजाता शेळके यांना धमकावून कारागृहाच्या बाहेर पळून जाण्यासाठी मुख्यद्वाराची चावी मागू लागला. त्यास शेळके यांनी नकार दिला. त्यावर सदर आरोपीने श्रीमती शेळके यांच्याशी झटापट करून त्यांच्या मानेवर सुरीचा वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्रीमती शेळके यांनी सदर सुरी एक हाताने पकडून त्याला प्रतिकार केला. अतिशय शौर्याने सदर आरोपीचा सामना केला. स्वतःच्या जीवावर आलेला प्रसंग असूनही, श्रीमती शेळके यांनी स्वतःकडे असलेली मुख्यद्वाराची चावी आरोपीला दिली नाही. या घटनेत श्री शेळके यांच्या तीन बोटांवर वार होऊन त्यास सात टाके पडले. सदर आरोपीनी श्रीमती शेळके यांना तसेच टाकून मुख्यद्वारातील टेबल मधील मिळेल ती चावी घेऊन मुख्यदाराच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. श्रीमती शेळके यांनी जखमी अवस्थेत प्रसंगावधान राखून कारागृहाच्या आतील पुरूष शिपाईंना घटनेबद्दल सांगितले. आतील शिपाई दिलीपसिंग जारवाल त्यांनी मुख्यद्वारात धाव घेतली. मुख्यद्वाराच्यावर चढून बाहेर जाण्याच्या प्रयत्नात असलेला आरोपीला खाली उतरवले व ताब्यात घेतले.  घटनेमुळे झालेल्या आरडाओरडीमुळे बाहेरून शिपाई महेंद्र ननवरे यांनीसुद्धा बंदी मुख्यदारातून बाहेर जाण्याचा प्रयत्न करीत असताना, त्याला बाहेरून ढकलून देऊन त्याचा प्रयत्न हाणून पाडला.
या कर्मचाऱ्यांचा सत्कार प्रभारी अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह, सुधार सेवा, दिपक पांडये यांच्या हस्ते करण्यात आला.  महिला शिपाईचा राष्ट्रपती शौर्यपदकासाठी प्रस्ताव पाठवण्याची विनंती माननीय महोदयांनी मान्य केली व अशारितीने उत्कृष्टपणे कर्तव्य पार पडणाऱ्या कर्मचाऱ्यांचे महोदयांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments