प्रभू येशूच्या विचारांतून सकारात्मक परिवर्तन शक्य : पाटोळे
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर : मनुष्याने नेहमीच स्वत:च्या हातून घडलेल्या पापासाठी क्षमायाचना केली पाहिजे, त्यांना परिवर्तन झाल्याचे निश्चितच दिसून येईल, असा संदेश प्रभू येशू ख्रिस्तांनी दिलेला आहे. प्रभू येशूंचे हेच विचार खर्या अर्थाने तारक आहेत. बंदीवानांनीही कळतनकळत झालेल्या चुकांचे चिंतन करून चांगलं करणे कळत असुनही जो ते करत नाही ते पाप आहे त्यामुळे बंदीबांधवाने स्वत:च्या मनात सकारात्मकता रुजवून स्वत:मध्ये सकारात्मक दृष्टीकोन तयार करावा. बंदीवान बांधवही आपल्या समाजाचाच एक भाग असून त्यांना पवित्र नाताळनिमित्त उबदार ब्लँकेटची भेट देताना प्रभू येशूच्या विचारांचीही शिदोरी देताना मनस्वी आनंद होत आहे, असे प्रतिपादन पोलिस मुख्यालय येथील येशू हाच प्रभु आहे. जीवंत हंगाम मंदिर, पोलीस मुख्यालय, अहमदनगर व मिशन सत्य वचन संस्थेचे प्रमुख संजीव पाटोळे यांनी केले.
ख्रिसमसच्या सणानिमित्त संस्थेच्यावतीने अहमदनगर जिल्हा कारागृहातील बंदीवानांना थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी उबदार ब्लँकेटची भेट देण्यात आली. या वाटप कार्यक्रमावेळी संजीव पाटोळे बोलत होते. कार्यक्रमास कारागृह अधीक्षक नागनाथ सावंत, सिनिअर जेलर शामकांत शेडगे, पत्रकार किरण बोरुडे, पास्टर पास्टर राजू आल्हाट, संदीप ठोंबे( स्वाभीमानी रिपब्लीकन पार्टी). राजू भिंगारदिवे, आयुष पाटोळे, गौतम विधाते (दाजी) राहुल विधाते, योगेश शिंगाडे, अक्षता पाटोळे, संगिता पाटोळे, कोमल मोहिते, काजल मोहिते, अंजली माने, बाळू धिवर, महिला पोलीस कर्मचारी रुपाली लोहाळे, सुनिता आव्हाड आदी उपस्थित होते.
0 Comments