Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

साईबाबा महाविद्यालयात ३१ वा रस्ता सुरक्षा सप्ताह उत्साहात

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शिर्डी - जीवनात रिटेक नाही, त्यामुळे प्रत्येकाने वाहन चालवितांना आपल्या जीवाची काळजी घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन शिडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत श्री साईबाबा महाविद्यालयात आयोजित केलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, प्रशासकीय अधिकारी दिलीप उगले आदिसह अधिक्षक राजेंद्र कोते, दिनेश कानडे, प्रा.शिवाजी ढोकणे, प्रा अमोल कचरे, प्रा स्वप्नाली खांडरे उपस्थित होते.
श्री गोकावे पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी वाहन चालविण्यासाठी आवश्यक असलेला परवाना काढणे गरजेचे आहे. विना परवाना वाहन चालविताना पकडले गेले तर त्यास पाच हजार रुपये दंड आकारण्यात येईल.यासाठी शासनाकडून अद्ययावत अशी ई-चलन यंत्रणा कार्यान्वीत केली आहे.या यंत्रणेदवारे नियमबाहय वाहन चालविणा-यांचे घरच्या पत्त्यावर दंडाचे रकमेची पावती येणार,हा दंड अप्रत्यक्षपणे तुमच्या पालकांनाच भरावा लागणार.म्हणून सर्वानी आपल्या पालकांना अशा प्रकारचा आर्थिक बोजा सहन करावा लागणार नाही याची काळजी घ्या.दुचाकी वाहनावर प्रवास करतांना फक्त दोघांनीच प्रवास करा, रस्त्याच्या उलट बाजूने वाहने चालवू नका,तिसरी व्यक्ती कितीही जवळची असली तरी त्या व्यक्तीला दुचाकीवर बसवून घेवू नका,दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेट जरूर वापरा आणि मोबाईलचा वापर करु नका असेही श्री गोकावे यांनी सांगितले.तसेच बाहन चालवितांना आपल्या जीवावर अभवा समोरच्याच्या जीवावर बेतेल असे वाहन चालवू नका.कारण मनुष्य जन्म हा एकदाच मिळतो,यात रिटेक नाही.तेव्हा सर्वांनी वाहतुकीच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करा असे आवाहनही श्री गोकावे यांनी केले.यावेळी प्राचार्य विकास शिवगजे यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्तविक करून विद्यार्थ्याना वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करण्याचा सूचना दिल्या. या कार्यक्रमास डॉ.गणेश भांड, प्रा.सुनील कवडे, प्रा.दीपक पटारे, प्रा.सोनाली हरदास, डॉ.सुनिता वडीतके, प्रा.शितल धरम, प्रा.सुनील पठारे, डॉ योगिता कोपटे, प्रा.नानासाहेब गुंजाळ, प्रा.नितीन पावसे, प्रा.विकास भांड, प्रा.प्रदीप शेलार, प्रा.प्रशांत हासे, प्रा.गणेश मगर, प्रा.नानासाहेब सदाफळ, प्रा.सुनिल गायकवाड,प्रशांत शेळके, मनोज बकरे, परवीन सय्यद यांच्यासह महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.संतोष औताडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments