Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेवगाव तहसीलवर सरपंच परिषदेचा महाविकासआघाडी सरकारच्या निषेधार्थ मोर्चाआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शेवगाव - अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव- पाथर्डी तालुक्यात सरपंच परिषदेच्या वतीने निषेध मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. थेट जनतेतून सरपंचाची निवड प्रक्रियेचा निर्णय राज्य सरकारने रद्द केला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या विरोधात सरपंच परिषदेने निषेध मोर्चा काढण्यात आला.
 शेवगाव तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून हा मोर्चा काढून तहसील कार्यालयावर नेण्यात आला. या मोर्च्यात सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, प्रदेश उपाध्यक्ष अनिल गिते यांच्यासह सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे "जनतेतून सरपंच पाहिजे" असे घोषवाक्य लिहिलेल्या टोप्या सर्व सरपंचांनी डोक्यात घालून काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध केला.सरपंचाची निवड थेट जनतेतूनच व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. जर सरकारने ही मागणी मान्य नाही केली तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.पूर्ण महाराष्ट्रभर हे मोर्चे काढण्यात येणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले.  
यावेळी मोर्चात सरपंच परिषद महाराष्ट्र शाखा शेवगाव अध्यक्ष बाबासाहेब गोरडे, उपाध्यक्ष गोकुळ भागवत, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, सरपंच धनंजय बडे पा., बापू आव्हाड, महेश अंगारखे, बबन भुसारी, अण्णा जगधने, रमेश भागवत, विकास भागवत, जालिंदर काळे, डॉ गोरक्षनाथ गिते, राजेंद्र दगडखैर आदिसह तालुक्यातील सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.Post a Comment

0 Comments