Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पाथर्डी शेतकऱ्यांचा तुर विक्रीबाबत संभम्र - नितीन बारगजे

आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर / व्हिडीओ

पाथर्डी - शेवगाव येथील तुर खरेदी केंद्रावर पाथर्डी परिसरातील शेतकऱ्यांची तुर खरेदी नाकारली आहे. यामुळे पाथर्डी शेतकऱ्यांनी अखेर अधिकत तुर विक्री कुठे करावी, याबाबत शेतकऱ्यांनी सवाला उपस्थित केला आहे.
शेतकरी नितीन बारगजे यांच्याशी चर्चा केली. याबाबत ते म्हणाले की, पाथर्डी तालुक्यात तुरीचे उत्पादन बऱ्यापैकी झाले आहे. परंतु ही तुर कुणाकडे, कुठे विक्री करावी, याबाबत अधिकत पाथर्डी परिसरातील शेतकऱ्यांना माहिती नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी संभ्रमावस्था आहे.शासन म्हणते ५,८०० भाव आहे, आणि शेतकरी ४२००, ४३०० रुपये भावाने विकतो आहे. तुर विक्रीबाबत माहिती घेतली असता, पाथर्डीत एका ठिकाणी तुर खरेदी चालू आहे.पण तेथे माणसी ५ क्किंटल तुर घेतली जाते. पण याची अधिकत माहिती नाही. तर दुसरीकडे शेवगाव तुर खरेदी केंद्रावर पाथर्डी परिसरातील शेतकऱ्यांची तुर खरेदी नाकारली आहे. यामुळे पाथर्डी चा शेतकरी चिंतातूर झाला आहे. याबाबत संबंधितांनी तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा शेतकऱ्यांना आंदोलनाचा पर्याय हातात घ्यावा लागले, असे त्यांनी म्हटले.

Post a Comment

0 Comments