Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आम्ही नगरकर कुठे नेऊन ठेवलं आहे आपलं/आमचं नगरच्यावतीने अहमदनगर शहर खड्डेमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनआँनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 

 अहमदनगर : आम्ही नगरकर कुठे नेऊन ठेवलं आहे आपलं/आमचं नगर च्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन देताना श्री. संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण सचिन भाऊसाहेब गुलदगड समवेत दत्तात्रय जाधव, हर्षल फुलारी आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. महानगरपालिका हद्दीतील एकही रस्ता हा खड्डेमुक्त दिसत नाही सर्व रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. या रस्त्यावरून नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. महानगरपालिका हद्दीतील एमआयडिसी रोड, पाईपलाईन रोड, गुलमोहर रोड, शनिचौक रोड, महात्माफुले रोड, वीर सावरकर मार्ग रस्ता, सर्जेपुरा रोड, कोठला रोड, सिद्धिबाग रोड, जुनाकोर्ट रोड, रामचंद्रखुंट रोड एवढेच काय तर जिल्हाधिकारी कार्यालय समोरील रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. कपडे फाटल्यावर ज्याप्रमाणे थिगळे लावतात. त्याप्रमाणे रस्त्यावर खड्डे बुजवले आहेत पॅच केलेला आहे. आज नागरिक घरपट्टी व पाणीपट्टी भारतात या पैशातून महानगरपालिका हद्दीतील सर्व रस्त्यांचे चांगल्या प्रतीचे दर्जेदार महाराष्ट्र शासन परिपत्रक प्रमाणे कामे करावे, दरवर्षी होणारा त्रास व त्यासाठी होणारा लाखो करोडो रुपयांचा खर्च वाचणार व वारंवार होणारा खर्च व नागरिकांना होणारा त्रास यावर योग्य प्रकारे चांगल्या प्रतीचे काम उपायोजना करण्यात यावे. महाराष्ट्र शासन परिपत्रक प्रमाणे जर रस्ते खराब झाले व खड्डे पडल्यास संबंधित ठेकेदार अधिकारी यांच्यावर दंडात्मक कारवाई करून ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे पुन्हा त्यांना काम देता येणार नाही तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. या रस्त्यावरून जात असताना छोट्या मोठ्या गाड्या खड्ड्यातून गेल्यावरती गाड्या चे नुकसान होऊन दुर्घटनाही होत आहे तरी वारंवार होणारा रस्त्यावरचा खर्च व नागरिकांना होणारा त्रास यावर योग्य प्रकारे चांगल्या प्रतीचे उपाययोजना करण्यात यावे व महिलावर्ग, शाळे विद्यार्थी, लहान मुले सायकल चालवताना खड्डे चुकवताना त्यांना जास्त त्रास होत आहे. त्यामुळे सर्व नगर शहरातील रस्त्याचे कामे ठेकेदाराच्या मार्फत दर्जेदार करून नगर शहर हा खड्डेमुक्त करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments