Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वाळू तस्करीतील आर्थिक हितसंबंधामुळे कोतवाली पोलीस निलंबित प्रकरणाची चौकशी व्हावी ; पोलीस महासंचालकाकडे श्याम असावा यांची मागणी


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडीओ
अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यातील कोतवाली पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना वाळू तस्करीमध्ये आर्थिक हितसंबंधाच्या कारणाने निलंबित झालेल्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी पोलीस महासंचालक, पोलिस महानिरीक्षक आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात श्याम असावा यांनी केली आहे.
कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलिसांना पैसे घेऊन वाळू वाहतूक करणाऱ्यांना सोडून दिल्याचा संबंधीत चालकाचा तो व्हिडीओ व्हायलर झाल्याने त्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना अहमदनगर जिल्ह्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी निलंबित केले. परंतु झालेली कारवाई संशयित वाटत आहे. खरे तर पोलिसांचे आर्थिक हितसंबंधाबाबत जो व्हिडीओ व्हायरल झालेला आहे. परंतु ढंपरचा नंबर व त्यात वाळू होती का नाही यावर व्हिडीओत भाष्य नाही. पोलिसांनी ५५०० ते ६००० रुपये घेतल्याचे सांगितले आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर संबंधित ढंपर चालकावर तथाकथित पोलिसांनी काय कारवाई केली. यामागील घटनाक्रमाची उकल झाली पाहिजे. मुळात कोतवाली पोलिस ठाण्याचा कारभार या पोलीस निरीक्षकांच्या कार्य काळात वादग्रस्त राहिला आहे. या पोलीस ठाणे हद्दीत अवैध व्यवसायाबाबत, तसेच पोलीसांचे अवैध व्यवसायिकांशी असणारे हितसंबंध वेळोवेळी पेपर मध्ये बातम्या छापून आल्या आहेत. यामुळे याप्रकरणाची गंभीरतेने दखल घ्यावी.
प्रभारी पोलीस अधीक्षक यांनी या पत्राची दखल घेऊन चौकशी केल्यास या प्रकरणाची गंभीरता व व्याप्ती लक्षात येईल. आमच्याकडे असणारी माहिती आपण लेखी मागणी केल्यास ती देण्यास तयार असल्याचे आसावा यांनी पत्रात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments